मुख्यमंत्री सहायता निधी साठी मा.आ. कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्याकडून पाच हजार रुपयांचा धनादेश ना.अनिलदादा पाटील यांना सुपूर्द.

अमळनेर (प्रतिनिधि) नामदार अनिलदादा पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन व वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून फटाक्यांची आतिषबाजी व प्रदूषण न करता अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाकडून मदत कार्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून या नैसर्गिक आपत्तीस सामोरे जाण्यासाठी आणि मदत व पुनर्वसनाच्या उद्भवलेल्या नैसर्गिक कामात आपलाही हातभार लागावा म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मा.आ. कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्याकडून पाच हजार रुपयांचा धनादेश ना.अनिलदादा पाटीलयांना देण्यात आला या वेळी जि.प सदस्या जयश्रीताई पाटील, जिल्हा बँक चेअरमन संजय पवार, माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील, मराठा समाज अध्यक्ष जयवंतराव पाटील,प्रा.अशोक पवार, भागवत सूर्यवंशी,डि. एम. पाटीलसर, श्यामकांत पाटील, ऍड.यज्ञेश्वर पाटील, माजी नगरसेवक निशांत अग्रवाल, राजूभाऊ वाणी, रवी पाटील, प्रभाकर पाटील, ज्ञानेश्वर पाटील सरयांचेसह पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..!