शास्त्री फार्मसीच्या डी. फ़ार्मच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

एरंडोल ( प्रतिनिधि )
पळासदळ येथील शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीच्या डिप्लोमा फार्मसी चा निकाल महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ द्वारे नुकताच लागला, त्यात विद्यार्थ्यांना घवघवीत यश प्राप्त झाले. प्रथम वर्ष डी. फार्म च्या साळी निकिता सुनील हिने ७०.५०% मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, पाटील योगिता वाल्मिक हिने ६८. ६०% मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर नंदाळे रोहित भाऊलाल याला ६७. ५०% त्रितिय स्थान प्राप्त झाले. द्वितीय वर्ष डी. फार्म मध्ये पाटील हर्षाली राजेंद्र हिने ७९. ०९% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला, चव्हाण उदय ज्ञानेश्वर याने ७६. ४६% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर पाटील निकिता कैलास हिने ७३.३६% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. चव्हाण उदय ज्ञानेश्वर हा विद्यार्थी २०२१-२२ मध्ये प्रथम वर्ष डी. फार्म मध्ये पहिला आला होता तर हर्षाली राजेंद्र पाटील ह्या विद्यर्थिनीने डी. फार्म २०२२-२३ मधील सर्वोत्कृष्ट विद्यर्थिनी चा विशेष सन्मान सुद्धा प्राप्त केलेला आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या या यशा बद्दल संस्थेचे सचिव सौ. रूपा शास्त्री, प्राचार्य डॉ. विजय शास्त्री, उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी, सर्व शिक्षक व शिकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले असे श्री. शेखर बुंदेले यांनी कळवले.