अमळनेर कृ. उ.बा. समितीतर्फे ना.अनिल पाटील यांचे आदिवासी नृत्यासह स्वागत.
क्रेनने भव्य हार टाकून सत्कार.

अमळनेर( प्रतिनिधि)येथील अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने विश्रामगृह समोरील महाराणा प्रताप चौकात क्रेनच्या सहयाने भव्य असा गुलाबपुष्पांचा हार ना.अनिल पाटील यांना फटाक्यांच्या आतिषाजित घालण्यात आला. यावेळी शिरपूर येथील आदिवासी मुली यांनी ना.अनिल पाटील यांचे औक्षण

केले. आदिवासी बांधवांच्या नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले याप्रसंगी कृ उ बा सभापती अशोक आधार पाटील, उपसभापती सुरेश पाटील, समाधान धनगर, डॉ.अशोक पाटील, संचालक नितीन पाटील, प्रकाश अमृतकार, एल टी पाटील यांचेसह गट सचिव संघटना जिल्हाध्यक्ष विजय पाटील ज्येष्ठ कार्यकर्ते रामराव पाटील,नगरसेवक विवेक पाटील, अर्बन बँक संचालक रणजित शिंदे आदि उपस्थित होते.