सोयगाव पंचायत समितीचा रोहयोचा तांत्रिक अधिकारी चार हजाराची लाच घेतांना चतुर्भुज;

0


जरंडी (साईदास पवार) सोयगाव पंचायत समितीच्या रोहयो तांत्रिक अधिकारी सचिन रोटे(वय ३०) यास मंजूर झालेल्या विहिरीचे मजूरी चे मस्टरप्रमाणे देयक मंजूर करण्यासाठी चार हजाराची लाच स्वीकारताना शुक्रवारी पंचायत समितीच्या कार्यालयात लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याची कारवाई छत्रपती संभाजीनगर च्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सोयगावात केली…
सोयगाव पंचायत समितीच्या सचिन नानासाहेब रोटे (वय३०) असे रंगेहाथ पकडलेल्याचे नाव आहे तक्रारदार यांच्या स्वतःच्या शेतीमध्ये महात्मा गांधी स्वयंरोजगार योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे मजुरीचे मस्टर प्रमाणे बिल मंजूर करण्या करिता प्रतिमस्टर 1000/- रुपये या प्रमाणे पाच मस्टरचे एकूण 5000/- रुपयांची मागणी करून तडजोडी अंती 4000/- रुपये देण्याचे ठरले होते शुक्रवारी( ता.०७)सोयगाव पंचायत समितीच्या कार्यालयात तांत्रिक अधिकारी सचिन रोटे याने लाचेची रक्कम स्वीकारली.दरम्यान यावेळी सापळा रचून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले पोलीस उपाधीक्षक, ला. प्र. वि मार्गदर्शक संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक राजीव तळेकर, पोलिस उप अधीक्षक आदींच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – संगीता पाटील,पोना शिरीष वाघ,विलास चव्हाण, चांगदेव बागुल आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे या कारवाई मुळे सोयगावात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची धाबे दणाणले आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!