ना.अनिल पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप…

अमळनेर (प्रतिनिधि )मंत्री नामदार भूमिपुत्र अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अमळनेर मतदार संघातील दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप करण्यात आले.
आमदार स्थानिक विकास निधीअंतर्गत वाढदिवसाचे निमित्त साधून सुरवातीला दहा दिव्यांग बांधवाना नामदारांच्या हस्ते हे साहित्य वाटप करण्यात आले. यात तीनचाकी सायकल, व्हीलचेअर, कुबड्या व कर्णयंत्र आदींचा समावेश आहे. यानंतर सुमारे चारशे ते पाचशे दिव्यांगाना साहित्य वाटप केले जाणार आहे. यावेळी जि प सदस्या जयश्री अनिल पाटील, रणजित पाटील, देविदास पाटील, उमाकांत साळुंखे, तापीराम पाटील, बिरजू चौधरी उपस्थित होते.