एरंडोल – रवंजे बू. येथील मारहाण झालेल्या मृत्यू प्रकरणी संशयीत आरोपीताना 4 दिवसांची पोलीस कोठडी.

एरंडोल ( प्रतिनिधि )
सदर गुन्ह्याचे कामी एरंडोल पोलिसांनी कलम ३०२,४३५ अंतर्गत गू.र.नं१२७/२०२३ नोंदवत गुन्ह्यातील संशयीत सहा आरोपींना दि. 8/7/23 रोजी मा.एरंडोल न्यायालयापुढे दुपारून हजर केले असता मे. न्यायालयात रिमांडच्या सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाचा तसेच आरोपी पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत मे. न्यायालयाने रिमांडचे कामी आरोपीतांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
यावेळी सरकार पक्षा तर्फे ॲड. रविता देवराज तर आरोपीं तर्फे ॲड. अजिंक्य काळे व ॲड. आकाश महाजन यांनी कामकाज पाहिले.