एरंडोल तालुक्यातील दोन विवाहिता बेपत्ता.

एरंडोल (प्रतिनिधि) एरंडोल तालुक्यातील दोन गावातील दोन विवाहिता एकाच दिवशी बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली असुन यात एकीने घरी कारण सांगुन तर एकीने काही एक न सांगता बेपत्ता झाली आहे.
तालुक्यातील रिंगणगाव येथील कांताबाई मराठे काही एक न सांगताच निघून गेली आहे. याबाबत एकनाथ मराठे यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन वरून मिळालेल्या माहितीनुसार दि.०८ जूलै २०२३ रोजी एकनाथ मराठे हे सकाळी १०.०० वा.सुमारास शेतात गेले असता तेव्हा पत्नी कांताबाई, आई कवसाबाई असे घरी होते मुले शाळेत गेलेली होती मराठे दुपारी ३.०० वा. सुमारास शेतातुन घरी आले असता आई कवसाबाई यांनी सांगितले की, सुनबाई कांताबाई हि सकाळी ११ वा. पासुन पायात चप्पल न घालता मला काही एक न सांगता घरुन निघुन गेली आहे. असे सांगितल्याने मराठे यांनी घरासमोर राहणारे बंटी नामदेव पाटील, याला वरील हककीत सांगितली मराठे व बंटी पाटील यांनी कांताबाई हिचा गावात व गावाच्या आजुबाजुच्या परीसरात पत्नी शोध घेतला असता ती मिळुन आली नाही तसेच नातेवाईक यांना पत्नी हिचे बाबत विचारपुस केली असता काहीएक माहीती मिळुन आलेली नाही म्हणुन एरंडोल पोलीस स्टेशनला पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार एकनाथ मराठे यांनी केली आहे.
याबाबत पूढील तपास पो.नि. सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे.
तर तालुक्यातील पिंपळकोठा खु. येथील कविता बुधा भिल वय. २४ वर्षे, हि दि. ८ जुलै २०२३ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घरात मुलगा भुषण यास तुझी मावशी हिस एरंडोल येथुन घेवुन येते असे सांगुन घरुन गेली. ती परत न आल्याने पती बुधा धनराज भिल यांनी पत्नी हरवल्याबद्दलची तक्रार एरंडोल पोलीस स्टेशनला दिली असून त्याबाबत पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रवींद्र तायडे हे पुढील तपास करीत आहे.