सेवानिवृत्त केन्द्र प्रमुख चींधू ओंकार वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या वाढदिवसाची दिली अनोखी भेट.

अमळनेर ( प्रतिनिधी) येथील चिंधू ओंकार वानखेडे यांनी आपल्या वाढदिवसाला गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.
आयुष्यभर शिक्षक म्हणून काम केलेले सेवानिवृत्त केंद्र प्रमुख चिंधू वानखेडे यांनी आपल्या सेवा कालावधीत अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना अडचण येऊ नये म्हणून शैक्षणिक साहित्य सह आर्थिक मदत करत होते.ते आपल्या पगारातील काही हिस्सा हा या गरजू मुलां साठी काढून ठेवत तर आता सेवा निवृत्त होऊन ही पेन्शन मधील काही हिस्सा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेल्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना मदत व्हावी म्हणून खर्च करीत आहे.या त्यांच्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या वृत्तीचा सन्मान म्हणून त्यांना भारतीय दलीत साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन गौरविंत केलं आहे.सेवा कालावधीत त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.यासह शैक्षणिक लिखाण पुरस्कार मिळाला आहे, त्यांनी कविता सह लेख लिहण्याचा छंद जोपासला आहे,सध्या ते जिल्हा उपाध्यक्ष भारतीय दलीत साहित्य अकादमी, दिल्ली.सेवा निवृत्त शिक्षक संघटनेचे सदस्य म्हणून कार्यरत आहे.त्यांनी आपल्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त पारोळा सह अमळनेर मधील १३ शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.