घर घेण्यासाठी माहेरून पैसे न आणल्याने विवाहितेचा छळ.

0


प्रतिनिधी (कुंदन सिंह ठाकुर)एरंडोल येथील सासुरवाशीण अक्षदा संजय पाटील हिने दि. ९ जुलै २०२२ रोजी पती व सासरच्यां विरुद्ध शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तुझ्या माहेराहुन घर घेण्यासाठी पैसे आण, तो पर्यंत तुला नांदविणार नाही, घरात घुसु देणार नाही,जर तु पैसे आणले नाही तर तुला फारकत देवुन टाकु असे म्हणुन शारीरीक, मानसिक छळ , करून अश्लील शिवीगाळ, चापटाबुक्यांनी मारहाण करुन धमकी देत असल्याने पती व सासर कडील ६ व्यक्ती विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
याबाबत गु. र.नं. १२९ भादवि कलम ४९८ अ, ३२३ , ५०४ , ५०६ प्रमाणे गुन्हा नोंद करुन पुढील तपास पो.निरी. सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ संतोष चौधरी हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!