विजेचा खांबाला बैलाचा स्पर्श झाल्याने शॉक लागून बैलाचा जागीच मृत्यू ..शेतकरी बचावला

0

अमळनेर (प्रतिनिधि) निम येथील रोहिदास रामसिंग चौधरी यांचा शेतात असलेल्या विजेचा खांबेला ताण दिलेल्या तारेला बैलाचा स्पर्श होताच बैलाचा मृत्यू झाला. तर शेतकरी किरकोळ जखमी झाला
याबाबत सर्विस्तर वृत्त असे की रोहिदास रामसिंग चौधरी यांनी त्यांचा शेतात कापूस या पिकाची वखरणी करीत होते वखरणी करीत असताना त्यांचा शेतात असलेल्या विजेचा खांबाला बैलाचा स्पर्श झाल्याने बैलाला विजेचा जोरदार शॉक लागला व बैलाचा जागीच मृत्यू झाला तर शेतकरी रोहिदास रामसिंग चौधरी हे देखील विजेचा शॉक मुळे दूरवर फेकले गेले. व किरकोळ जखमी झाल्याने कळमसरे येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेतले वखरणी करीत असताना वखर हा लाकडाचा असल्याने दुसरा बैल व शेतकरी बचावले. सदर शेतकर्यांने दुसऱ्या कडन उसनवारी ने बैल शेताच्या कामासाठी एका दिवसाठी मागवला होता ईलेक्टीकल खांबारील चिनिचे ईन्सुलिटर पंचर झाल्याने ताण दिलेल्या खांबावरील तारेत विजेचा प्रवाह शिरला असावा असे सांगितले जात आहे कळमसरे सबसटेशन मधील वायरमनांनी लागलीच त्या भागातील विद्युत पुरवठा बंद केला तरी शेतकऱ्याची परिस्थिती ही अत्यंत नाजूक असून त्याची परिस्थिती पाहता वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यास आर्थिक मदत करून सहकार्य करावे अशी मागणी निम येथील शेतकरी करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!