सप्तशृंगी गडावर जातांना बस 400 फूट खोल दरीत कोसळली; १५ ते. २० प्रवाशी जखमी ..

24 प्राईम न्यूज 12 jul 2023
सप्तशृंगी गड घाटात एसटी बसला भीषण अपघात झाला असून ही बस थेट ४०० फूट दरीत कोसळली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात असून १५ ते २० जण जखमी झाल्याचे समजते आहे. सविस्तर वृत्त असे की ही बस सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेने जात असताना घाटातील गणपती टप्प्यावरुन नियंत्रण सुटले. यानंतर बस थेट ४०० फूट खोल दरीत कोसळली. बसमध्ये २० प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळत सप्तश्रृंगी गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू आहे. अपघातग्रस्त बस खामगाव आगाराची असून काल सकाळी ८.३० वाजता ही बस सप्तशृंगी गडाकडे आली होती. त्यानंतर रात्री ती सप्तशृंगी गडावर मुक्कामी थांबली होती. सकाळी पुन्हा सप्तशृंगी गड ते खामगाव (बुलढाणा) असा बसचा प्रवास सुरू झाला होता. वणीच्या सप्तशृंगी गडावरून खाली येत असतानाच या बसला भीषण अपघात झाला. झाला.अपघातात अमळनेर तालुक्यातील मुडी येतील महिला आशाबाई राजेंद्र पाटील वय ५० हीचा मृत्यू होऊन इतर १२ महिला जखमी झाल्या आहेत. घटनेचे वृत्त कळताच मंत्री अनिल पाटील यांनी प्रशासनाला आदेश देऊन मुंबई येथून घटनास्थळी रवाना झाले आहेत..