सुप्रीम कॉलनी दगडफेकी प्रकरणात भा.द.वी ३०७ रद्द करा तसेच निष्पाप संशयित आरोपींची सुटका करा..
सुप्रीम कॉलनी परिसरातील नागरिकांची मागणी.

जळगाव ( प्रतिनिधि)
९ जुलै रोजी दोन गटात झालेल्या दगडफेकीत एका गटावर भादवी ३०७ प्रमाणे गुन्हा नोंदवून ८ आरोपींची नावे व १० अज्ञात आरोपी च्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.
दुसऱ्या गटातील १४ तरुणाविरुद्ध साधा दंगलीचा गुन्हा दाखल असल्याने हा अन्याय व भेदभाव असल्याने ते त्वरित दूर करा व ज्या तरुणाविरुध्द

भा द वी ३०७ प्रमाणे गुन्हा नोंद झालेला आहे त्यातील ३०७ कलम रद्द करण्यात यावे, तसेच ज्यावेळी दगडफेक झाली त्यावेळी श्री इसरार बाबर देशमुख व जुबेर नुरा देशमुख हे दोघी आप आपल्या कामानिमित्त बाहेरगावी असताना सुद्धा त्यांची नावे एफ आय आर मध्ये लिहिण्यात आली त्यांचे कागदपत्रे पुरावे बघून त्यांची नावे त्वरित कमी करण्यात यावी तसेच दोघा बाजूंकडून ज्यांनी दगडफेक केली आहे त्या दोघी समाजातील तरुणांवर एकाच प्रकारे न्याय भूमिका घ्यावी अशा तीन मागण्याचे निवेदन पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांना बुधवारी संध्याकाळी देण्यात आलेले आहे.
पोलिसांचे आश्वासन
जो कोणी दंगलीमध्ये नसेल तर त्याचे नाव नजर चुकीने किंवा साम्य नावामुळे आले असेल तर ती नावे कमी करण्यात येतील. तसेच तपास प्राथमिक स्वरूपात असल्याने भादवी ३०७ हे कलम पूर्ण चौकशी झाल्यावर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच दोघांकडे ज्या तरुणांनी कृत्य केलेले आहे त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला पोलीस उप विभागीय अधिकारी संदीप गावित यांनी दिले.
लोकांनी आपल्या घरी परत यावे- आवाहन
जे लोक दगडफेकी च्या भीतीमुळे व पोलिसांच्या कारवाईमुळे आपली घरे सोडून निघून गेलेली आहे त्यांनी भीती न बाळगता आपल्या घरी परत यावे असे आवाहन सुद्धा सुप्रीम कॉलनी
परिसरातील नागरिक व पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेले आहे.

सुप्रीम कॉलनी शिष्टमंडळात यांचा होता समावेश
मनीयार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, एडवोकेट
वसिम काझी व एडवोकेट इमरान शेख,आसिफ हाजी, राजू पटेल, वाहेद सेठ,अकील मन्यार,मजीद पटेल,रऊफ खान,मंजूर पटेल,रमजान पटेल,आझाद पटेल, मुजाहिद पटेल,शब्बीर पटेल,अफजल मिया,पटेल बिर्याणी, आदींचा समावेश होता.