नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱयांनी दिले मुक्या जनावरांला जीवनदान.

अमळनेर (प्रतिनिधि) उघड्या विहिरीत पडलेल्या कुत्र्याचे अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱयांनी प्राण वाचवून त्याला बाहेर काढले आहे.
पिंपळे रोडवरील स्वामी विवेकानंद नगर मध्ये एका खोलवर पाणी असलेल्या विहिरीत

कुत्रा पडला. जीवाच्या आकांताने कुत्रा भुंकत होता. त्याला वर येता येत नसल्याने तो सारखा पाण्यात पोहत होता. नागरिकांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्याकडे मदत मागितली असता त्यांनी अग्निशमन दलाला मदतीसाठी पाठवले. अग्निशमन दलाचे कर्मचारी नितीन खैरनार ,दिनेश बिऱ्हाडे , जफर खान ,आनंदा झिम्बल यांनी खोल विहिरीतून कुत्र्याला बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. न पा च्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी भूतदया दाखवल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.