नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई द्या. NSUI तर्फे जिल्हाधिकारीना निवेदन.

रावेर,( राहत खाटीक ) रावेर तालुक्यात दि. ५ जुलै रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणेबाबत .NSUI प्रदेश सचिव धनंजय चौधरी जिल्हाध्यक्ष भुपेश जाधव यांनी रावेर शहर रसलपूर शिंदखेडा रंमजीपुर खिरोदा प्र. रावेर भागात अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसान झालेल्या नागरीकांना तात्काळ मदत घ्यावी यासंदर्भात जिल्हाधिकारी अमन मित्तल साहेबांना निवेदन दिले
रावेर तालुक्यात वारंवार अतिवृष्टी व चक्रीवादळाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. व त्यांच्या उभ्या पिकाची अपरिमित हानी होत आहे. साधारणतः दरवर्षीच शेतकऱ्यांना अशा संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी मोडून पडण्याची शक्यता आहे..
त्यातच रावेर तालुक्यात दि. ५ जुलै २०२३ रोजी रात्री ९.०० वाजता ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने सातपुड्यातील सर्वच नद्यांना मोठा पूर आला. यात तीन जणांचा मृत्यू झाला असून २० जनावरे वाहून गेलेले आहेत. तसेच तालुक्यातील रमजीपूर, रावेर, खिरोदा प्र.रावेर, रसलपूर, शिंदखेडा, मोरव्हाल या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी घुसून १४५ घरांचे अतोनात नुकसान झालेले आहे.
आपणास आमची विनंती आहे की, अतिवृष्टीमध्ये मृत्यू झालेल्या लोकांच्या वारसांना ५ लाख रु.
निधी देण्यात यावा, तसेच ज्यांची जनावारे वाहून गेलेले आहेत. व ज्यांच्या घरांचे नुकसान झालेले आहेत
त्यांना ताबडतोब झालेल्या पंचनाम्यांच्या अनुषंगाने त्वरीत अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे ही विनंती.