एरंडोल न्यायालयातर्फे कायदेविषयक शिबीराचे आयोजन

प्रतिनिधी ( कुंदन ठाकुर )
एरंडोल येथील तालुका विधी सेवा समिती, तालुका वकील संघ, एरंडोल आणि सरस्वती विदयाप्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विदयमानाने ” जागतिक लोकसंख्या दिना ‘’ निमित्त दिनांक ११ जुलै, २०२३ रोजी सरस्वती माध्यमिक विदयालय, विखरण ता. एरंडोल, जि. जळगाव येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले.
त्याअनुषंगाने दिनांक ११ जुलै , २०२३ रोजी सरस्वती माध्यमिक विदयालय, विखरण ता. एरंडोल, जि. जळगाव येथे अॅड. श्री. विलास के. माेरे, अॅड. श्री. ज्ञानेश्वर बी. महाजन, श्री. विशाल श्रावण धोंडगे, न्यायाधीश एरंडोल यांनी ” Child Friendly legal sevices to children and their protection scheme” , ” Rights of Children” , “Public Utility Services and Central/State Government Schemes”, “Juvenile Justice Act”, ” Beti Bachao Beti Padhao ” आणि ” POCSO Act ” या विषयांवर विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती बी. ए. तळेकर, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तथा दिवाणी न्यायाधीश एरंडोल, यांनी देखील विदयार्थ्यांना सदर विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पी.बी.महाजन सर यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री. नितीन व्ही. बेडिस्कर यांनी केले. सदर कार्यक्रमास श्रीमती बी.ए.तळेकर, दिवाणी न्यायाधीश एरंडोल, श्री. विशाल श्रावण धोंडगे, दिवाणी न्यायाधीश, एरंडोल, अॅड. विलास के. मोरे, अॅड. श्री. ज्ञानेश्वर बी. महाजन, सचिव तालुका वकील संघ एरंडोल, डाॅ.श्री. राजेंद्र देसले सर, सचिव सरस्वती विदयाप्रसारक मंडळ विखरण, अॅड. श्रीमती प्रतिभा पाटील, तसेच इतर विधीज्ञ, इतर शिक्षक कर्मचारी, विदयार्थी, न्यायालयीन कर्मचारी श्री. संदीप एन. हरणे, पो.ना. धर्मेंद्र विठ्ठल ठाकूर इ. उपस्थित होते. सदर कार्यक्रमांस अंदाजे ३०० जणांची उपस्थिती होती.