मिस्टर,मिसेस ने स्पर्धा गाजवली. उपमुख्याधिकारी संदीप व वर्षाराणी गायकवाड यांचे यश..

अमळनेर (प्रतिनिधि) लोणावळा येथे झालेल्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत अमळनेर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी पुरुषांच्या ५० किमी स्पर्धेत द्वितीय क्रमांक, तर त्यांच्या पत्नी वर्षाराणी

गायकवाड यांनी महिलांच्या ३५ किमी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.
विविध वयोगटातील विविध ५, १०, २१,३५,५० किमी अंतरासाठी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. चढ उताराचे अंतर, धुके, भुरभुरणारा पाऊस, वारा अशा आव्हानांना
मात देत ही स्पर्धा त्यांनी पूर्ण केली. पावसाळ्यातच ही स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत देशभरातील १३ राज्यांतून ४८ शहरातून ११०० स्पर्धक सहभागी झाले होते. उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड ३५ ते ४५ वयोगटातून ५० किमी स्पर्धेत द्वितीय, तर त्यांच्या पत्नी वर्षाराणी गायकवाड या २६ ते ३५ वयोगटात ३५ किमी धावणे स्पर्धेत प्रथम आल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, संजय चौधरी, प्रसाद शर्मा, सोमचंद संदानशिव यांनी कौतुक केले आहे.