जिल्हाधिकारी अमन मित्तल अमळनेरात,शासकीय विभागाची आढावा बैठक..

अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर येथे आज जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली ग. स. हायस्कूलमध्ये सकाळी १० वाजता तालुक्यातील शासकीय विभागांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
त्यानंतर तालुक्यातील अधिकाऱ्यांची बैठक ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे तर साडेबारा वाजता नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. नागरिकांनी त्यांच्या तक्रारी व समस्या असल्यास जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडाव्यात, असे आवाहन उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर आणि तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केले आहे