धुळे एमआयडीसीतील वॉटर सप्लाय जवळील जुनी भिलाटी येथील वीज कनेक्शन काढून टाकल्याने तेथील रहिवाशांनी आज माजी आमदार श्री अनिल अण्णा गोटे यांची घेतली भेट…

धुळे (प्रतिनिधि) एमआयडीसीतील वॉटर सप्लाय जवळील जुनी भिलाटी येथील वीज कनेक्शन काढून टाकल्याने तेथील रहिवाशांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे माजी आमदार श्री अनिल अण्णा गोटे यांची

घेतली भेट…
आज दिनांक १७/७/२०२३ रोजी धुळे एमआयडीसी लगत येणाऱ्या तसेच तेथील वॉटर सप्लाय जवळील राहणाऱ्या रहिवाशांच्या वापराचे असलेल्या विद्युत कनेक्शन विद्युत लाईन ही जुनी झाल्याचे कारण सांगून धुळे महावितरण (एम एस सी बी) विभागाने काढून टाकल्याने ऐन पावसाळ्यात गोर गरीब,हात कामगार, मोल मजुरांचे अंधारामुळे हाल होत आहेत. तसेच रहिवाशांनी एक महिन्या अगोदर पासून एम एस सी बी विभागाकडे नवीन विद्युत कनेक्शन साठी अर्ज देऊन देखील त्यावर कुठलेही कारवाई होत नाही. तसेच घरपट्टी पाणीपट्टी वेळचे वेळी भरून देखील अचानकच विद्युत कनेक्शन काढून टाकल्याने जुनी भिलाटी तील रहिवाशांनी माजी आमदार श्री गोटे साहेब यांची आज भेट घेतली. तसेच यावेळी त्यांनी सांगीतले की आमच्या रहिवास ठिकाणा जवळील एमआयडीसीतील पिण्यायोग्य पाणी तर नाहीच व वापरण्यायोग्य देखील पाणी नसल्यामुळे वृद्ध व लहान बालके,महिलांना वेगवेगळ्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे.
यावेळी श्री गोटे साहेबांनी आपल्या भ्रमणध्वनीवरून तात्काळ संपर्क साधून एमआयडीसीतील एम एस ई बी विभागातील अधिकाऱ्यांना सुचीत करून लागलीच जलद गतीने रहिवाशांचे विद्युत कनेक्शन पूर्ववत करावे व त्यांनी नवीन विद्युत कनेक्शन साठी केलेल्या अर्जावर लवकरात लवकर निर्णय घेऊन योग्य ती कारवाई करण्यासंबंधी सांगितले. तसेच उपस्थित रहिवाशांना उर्वरित अडीअडचणी विषय पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासंबंधी आश्वासित केले.
यावेळी एमआयडीसीतील जुनी भिलाटी येथील रहिवासी दादाभाऊ चिंदा ठाकरे, राजाराम भगवान सोनवणे,वाल्मीक दोदू सोनवणे, रोहिदास शिवराम माळी, गणेश दगा कुवर, प्रदीप राजाराम सोनवणे आदी व ७० ते ८० रहिवासी उपस्थित होते. अशी माहिती त्यांचें प्रतिनिधी श्री रवी भाऊ मालचे यांनी दिली व राष्ट्रवादीचे अविनाश भाऊ लोकरे प्रसिद्धी प्रमुख व सोशल मीडिया प्रमुख धुळे शहर कार्यकारणी यांनी प्रसिद्ध केली