वंचित बहुजन आघाडी जि. जळगांव पूर्व मुस्लीम, मातंग, बौध्द बंचित बहुजन समाजावरील अत्याचाराविरुध्द जनआक्रोश मोर्चा..

अमळनेर( प्रतिनिधि ) महाराष्ट्र राज्यामध्ये मुस्लिम, मातंग, बौद्ध, बंचित बहुजन समाजावर सातत्याने सेन हल्ले होत आहेत अत्याचाराच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनला तक्रार करायला गेले तर पोलीस

पीडीता वरच दरोड्याचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन गुंड प्रवृत्तीस पाठीशी घालत आहेत अमळनेर दंगलितील संशयीत आरोपी अशपाक शेख चा पोलिस कोठडीत मृत्यु होतो व चौकशी हि होत नाही अशा परिस्थितीत पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही त्यांना निलंबित केले जात नाही व बांभोरी ता. धरणगांव येथील आशिष शिरसाळे या तरुणाचा खुण करून पळून जाणारा आरोपी वाळू माफिया यास पळून जाण्यास सहकार्य करणारा सर्कल अधिकारी अमोल पाटील याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होत नाही. म्हणून पोलीस अधिकारी मुजोर झाले आहेत आमचे कुणीही वाकडे करणार नाही अशा अविर्भावात मुस्लिम, मातंग बौद्ध वाँचत बहुजन समाजाशी वर्तन करत आहेत यातून स्थानिक राजकीय पुढा-यांचे पाठबळ आहे की काय…..? अशी शंका येत आहे.त्यामुळे संविधान मानणान्या या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढावेच लागेल जरीन खान मृत्यू प्रकरणा सारया पटना पुन्हा होऊ नये म्हणून गुप्त विरोधामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वंचित बहुजन आघाडी जिल्हा जळगांव (पश्चिम विभाग) च्या वतीने अमळनेर प्रांताधिकारी कार्यालयावर प्रचंड जन आक्रोश मोर्चाचे रणशिंग फुंकले आहे या मोर्चामधील प्रमुख. मागण्या.
प्रमुख मागण्या पुढीप्रमाणे.
(१) मयत आशिष शिरसाळे रा. बांभोरी, ता. धरणगाव, जि.जळगांव याच्या खुणातील आरोपींना मदत करणारा पाळधी येथील सकल अमोल पाटील यांच्यावर भा.द.वि. कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल होऊन तात्काळ अटक करण्यात यावी व त्यांना निलंबित करण्यात यावे.
(२) अमळनेरच्या अशफाक शेखच्या मृत्युची व अमळनेरच्या दंगलियों निवृत्त न्यायाधिशा मार्फत
उच्च स्तरिय चौकशी करून यात दोषी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ निलंबित
करावे. व अशफाक शेख याच्या कुटूंबाला ५० लाखाची आर्थिक मदत मिळावी. ३) नांदेड जिल्हातील बौहार गावच्या अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी
४) रेणापूर येथील मातंग बांधवाचा खून करणान्या आरोपीला फाशाची शिक्षा व्हावी.
(५) भूम येथील फरमान पठाण आत्महत्या प्रकरणातील सर्व आरोपीना अटक करून शिक्षा व्हावी. ६) जळगांव जिल्हयामध्ये महापुरूषांच्या विटंबणा करणाया दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी. ७) परळीचे जरीन खानचा पोलिस कोठडीत खून करणाऱ्या पोलिस कर्मचान्यावर सदोष मनुष्यवधाचा ३०२ गुन्हा दाखल करुन आरोपीला तात्काळ अटक करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. जरीन खानच्या कुटूंबियांना ५० लाखाची शासकीय आर्थिक मदत मिळावी,
अशा सर्व घटनांचा विचार केला असता राज्यात दलीत मुस्लीम यांच्यावर अन्याय प्रमाण वाढत चालले आहेत या सगळ्या घटनांचा वंचित बहुजन आघाडी जिल्हा जळगाव पश्चिम विभागाच्या वतीने आम्ही महाराष्ट्र सरकारला इशारा देतो की वरील मागण्यांचा गांभीर्य पूर्वक विचार झाला नाही तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. बाळासाहेब तथा अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने व मा. प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात या प्रश्नाच्या संदर्भाने मुस्लीम व दलीत समाजामध्ये जावून त्यांच्या मध्ये जनजागृती करत जन आंदोलन उभे करू. त्यामुळे कायदा आणिसुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण झाला तर यास महाराष्ट्र शासन व प्रशासन व्यक्तीशः जबाबदार राहील,
याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी.