हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे परीक्षा हॉल व लेक्चरर हॉल आणि जिल्हा रुग्णालयातील स्त्री व बाल विभागासाठी पावसाळी अधिवेशनात २३कोटी मंजूर:आ.शाह यांच्या प्रयत्नांना यश..

अनिस ( खाटीक )
भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे परीक्षा हॉल व लेक्चरर हॉलचे बांधकाम करणे. तसेच धुळे जिल्हा रुग्णालयातील 100 खाटांचे स्त्री व बाल रुग्णालय यांच्या बांधकामासाठी तसेच भाऊसाहेब हे मेडिकल कॉलेज येथील नवीन इमारतीसाठी आमदार फारुक शाह यांच्या प्रयत्नाने पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी अर्थसंकल्पात या कामांना मंजुरी मिळालेली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अर्थसंकल्पात धुळे शहरातील स्त्री व बाल रुग्णालय याच्या अतिरिक्त वाढीव कामासाठी महाराष्ट्र शासनाने नऊ कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. धुळे शहरात शासनाचे एक सुद्धा स्त्री व बाल रुग्णालय नसल्यामुळे शहरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत तसेच या 100 खाटांचे रुग्णालयासाठी अनेक राजकीय पक्षांनी आंदोलने केलेली होती, परंतु आ. फारूक शाह साहेबांच्या अथक प्रयत्नाने या कामासाठी अतिरिक्त निधी शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच हिरे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी लेक्चरर हॉलची फार आवश्यकता होती, याची सुद्धा या पावसाळी अधिवेशनात उर्वरित अर्थसंकल्पात शासनाने मंजुरी दिलेली आहे तसेच भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज येथील सुसज्ज असे अत्याधुनिक शवविच्छेदगृहाच्या कामासाठी सुद्धा शासनाने या अर्थसंकल्पात मंजुरी दिलेली आहे. धुळे शहर आमदार फारूक शाह हे या कामासाठी प्रयत्नशील होते त्याला आज मंजुरी मिळाल्यामुळे शहरवासीयांची मोठ्या प्रमाणात गैरसोय दूर होत आहे. आमदार फारुक शाह यांनी जिल्हा रुग्णालयासाठी व ही भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज साठी करोडो रुपयांच्या निधी आजपर्यंत आणलेला आहे. आमदार फारुक शहा यांचे फक्त एकच ध्येय शहरातील लोकांचे आरोग्य व मूलभूत सुविधा कशाप्रकारे देता येईल याच्यासाठी आमदार फारुक शाह हे प्रयत्नशील आहे व पुढे सुद्धा असेच कार्य चालू राहणार आहे. या कामाच्या मंजुरीमुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे..