श्रीक्षेत्र सुकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचा भव्य सुवर्ण महोत्सव सत्कार-किर्तन सप्ताह..

एरंडोल ( कुंदन सिंह ठाकुर) तालुक्यातील रवंजे येथील श्रीक्षेत्र सुकेश्वर येथेे पंचक्रोशितील भाविक भक्त व भजनी मंडळी यांचे सहकार्याने आणि हभप विजय महाराज भामरे अध्यक्ष, श्री. क्षेत्र सुकेश्वर देवस्थान यांचे मार्गदर्शनाने पुरुषोत्तम मास निमीत्त भव्य ज्ञान यज्ञ आणि श्री क्षेत्र सुकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचा भव्य सुवर्ण महोत्सव सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी उपस्थितीचे आवाहन केेले आहे.
कार्यक्रमादरम्यान दररोज काकड़ा भजन, प्रवचन, हरिपाठ तर सकाळी आणि रात्री कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 23 जुलै रोजी देवदेवता पूजन, सप्ताह मांडणी. दररोज रात्री ह.भ.प. महेश महाराज (बालकीर्तन कार) चिखल, ह.भ.प.कन्हैया महाराज (अध्यक्ष, संत मीराबाई मंदिर राहिरे (अध्यक्ष संत ज्ञानेश्वर आश्रम चांगदेव), ह.भ.प.विजय महाराज भामरे (अध्यक्ष, श्री क्षेत्र सुकेश्वर देवस्थान), ह.भ.प. भागवत महाराज (अध्यक्ष,श्रीकृष्ण मंदिर शिरसोली), ह.भ.प. जगद्गुरू द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्ण महाराज, लहवीतकर, नाशिक, ह.भ.प. संजय महाराज, वडगांव कर (अध्यक्ष,श्रीगुरू प.पु. ब्रह्मलीन नथ्थू सिंग महाराज संस्थान श्री क्षेत्र टेंभे, शिरपूर), ह.भ.प.संदीप महाराज येवले (नाशिक ) हे किर्तनसेवा देणार असून दि.30 जुलै रोजी सकाळी 9 ते 11 काल्याचे कीर्तनाची सेवा ह.भ.प. लिलाधर महाराज (ओझर,चाळीसगाव) देणार आहेत. समारोपाच्या दिवशी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच कार्यक्रमात 8 ही दिवस राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी तालूक्यासह परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष, ह.भ.प. विजय महाराज भामरे, सचिव समाधान पुंडलिक कोळी आणि समस्त विश्वस्त मंडळ यांनी केले आहे.