मणीपुर मधील महिला सोबत झालेल्या अन्यायाचा जळगावात तीव्र निषेध..
रविश कुमारच्या आवाहनास प्रतिसाद..

जळगाव ( प्रतिनिधि )
मणीपुर मागील अडीच महिन्यापासून हिंसाचारापासून धगधगत असताना त्या ठिकाणी दोन महिलांना नग्न करून त्यांच्या शरीराशी खेळून पुरुषांच्या
टोळक्यांनी आनंद घेतला त्या घटनेचा जळगाव मधील अल्पसंख्यांक समाजाती
ल सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध करून मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री व ज्यांनी अत्याचार केले त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.

रविश कुमार च्या आवाहनास प्रतिसाद
रविश कुमार यांनी सर्व समाजाला समाज मध्यामाद्वारे एक अपील केले की आता तरी काही बोला त्याला जळगावातील संघटनांनी प्रतिसाद देत एक
निवेदन उपजिल्हाधिकारी महसूल श्रीमती शुभांगी भारदे यांना दीव्यांग तरुण मुजाहिद खान यांनी महामहीम राष्ट्रपतींना सुपूर्द करण्यासाठी दिले
शिष्टमंडळात यांचा होता समावेश
जळगाव जिल्हा मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, दिव्यांग संघटनेचे मुजाहिद खान, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष मजहर पठाण, राष्ट्रीय काँग्रेस महानगर अध्यक्ष अमजद खान, महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस सचिव बाबा देशमुख, सिकलगर फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर खान, कुल जमाती अध्यक्ष सैयद चांद, मण्यार बिरादरी युवा अध्यक्ष अख्तर शेख, मर्कज फाउंडेशनचे वसीम शेख,सद्दाम फाउंडेशनचे ताहेर शेख व जुलकर नयन, बी वाय एफ चे अध्यक्ष शिबान अहमद, मणियार पंच कमिटीचे रऊफ शेख व रफिक शेख, मुस्लिम कॉलनी चे जावेद सलीम, उस्मानिया पार्क चे एस आर शेख आदींची उपस्थिती होत.