लोक संघर्ष मोर्चा ने मणिपूर येथील महिलांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करित मा. महामहिम द्रौपदीजी मुर्मू, भारताच्या राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी मार्फत दिले निवेदन.

0


अमळनेर (प्रतिनिधि) अमळनेर शहरातील लोक संघर्ष मोर्चा चे पदाधिकारी यांनी आज रोजी मणिपुर येथे घडलेल्या महिलांवरील अत्याचारा बाबत राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांना पुढील प्रमाणे निवेदन दिले,
ह्या भारत मातेच्या महामहिम राष्ट्पतीजी आपन हि एक महिला असुन आपल्या देशामधे आजपर्यंन्त कधी न
घडलेला कधी न पाहिलेला महिलांवरील एवढा मोठ्ठा अत्याचार संपुर्ण भारतासह जगभरात विवीध वृत्तवाहीनी व
शोषल मिडियाद्वारे सर्व महिला पुरुष पाहत असुन, आपल्या कार्यकाळात अश्या घटना घडत असतील तर हे भारत मातेच्या आमच्या आया, बहीणींसाठी खुप मोठ दुर्दैव समजाव लागेल,
सदरची घटना घडुन दोन, अडीच महिने उलटुन हि मणिपुर मधे सुरु असलेला हिंसचार, अत्याचार तेथील राज्य
सरकार व केंद्र सरकार सह जगभर नाव मोठ करणारे पंतप्रधान मणिपुर येथे जावुन शांततेचे अवाहन करु शकले नाही,
जे शासन आपल्या देशातील आपल्या राज्यातील महिलांच संरक्षण करु शकत नाही, जे सरकार त्यांच कर्तव्य पार पाडू
शकत नाही, अश्या निष्क्रीय राज्य व केंद्र सरकारला घरी बसवण्याचा व भारतीय जनतेला न्याय देण्याचा अधिकार
बाबासाहेबांच्या भारतीय संविधानाने आपल्याला दिलेला आहे.
आम्ही आपणास विनंती करतो की,
1) मणिपूर मधील घटनेतील सर्व दोषी ते 1दोन नव्हे तर झुंड होते त्या सर्वांना अटक करत तात्काळ फाशी देण्यात यावी.
2)मणिपूर मधील कुकी समाज आदिवासी असून त्यांच्या अधिकारावर गदा आणण्या साठी त्यांना आपल्या गावातून व प्रदेशातून बेदखल करण्याचे जे षडयंत्र राज्य सरकारच्या व प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू आहे ते तात्काळ थांबवून ,कुकी समाजातील सर्व लोकांना पुरेसे संरक्षण देत त्यांना पुन्हा आपल्या गावी प्रस्थापित करावे. व सर्व आरोपींवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्या अंतर्गत व दंगली व मनुष्यखुनाचे गुन्हे दाखल करावेत
3) पोलीस प्रशासनातील ज्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांनी संबंधित महिलांना जमावाच्या हवाली केले व त्यांचे शोषण होवू दिले त्यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांच्यावर हि सदर कलमान्वये ३४ प्रमाणे गुन्हे दाखल करावेत.
4)मणिपूर सरकार राज्य चालवण्यासाठी निष्क्रिय ठरले असून ह्या घटना त्यांच्या आशीर्वादाने घटना आहेत असे आमचे ठाम मत बनले आहे,अश्या निष्क्रिय सरकारला ताबडतोब बरखास्त करत राष्ट्रपती राजवट लागू करावी
5) केंद्र सरकारने ह्या कृत्यात कुठेही सक्षमरित्या हस्तक्षेप केला नाही ह्या बाबत अनुसूचित जाती जमाती कायद्या अंतर्गत त्यांना ही दोषी ठरवले जावे व संबंधित मंत्री व अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करावेत.
मणिपूरच्या घटने मुळे आम्ही प्रचंड व्यथीत झाले असून आपल्या कडून न्यायाची अपेक्षा करीत आहोत . मणिपूर मधील कुकी समाजावरील अत्याचार थांबले नाहीत व दोषींना सजा झाली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू असा इशारा चे निवेदन लोक संघर्ष मोर्चा चे पन्नालाल मावळे सह संदिप घोरपडे सर, रियाज़ शेख, मुख्तार खाटीक, फ़िरोज मिस्तरी,राजू शेख, सुरेश पाटील, मधुकर चव्हाण,हाजी दबीर पठाण, रणजीत पाटील,इमरान खाटीक, अहमद पठाण, हाजी तोहर शेख,इमरान क़ुरेशी,असलम काझी सर, विजय (पिंटू) पारधी, रमण, हाजी बशीरोद्दीन शेख, अहमद अली, मुन्ना शेख,शाहरुख सिंगर, अनिल पारधी, किरण सोनवणे, अविनाश पवार, गणेश चव्हाण, फय्याज सर, शेख, गोरख चव्हाण, आसिफ बागवान यांनी उपविभागीय अधिकारी मार्फत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांना देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!