अमळनेर लायन्स क्लब विविध पुरस्कारांनी सन्मानित..
माजी अध्यक्ष योगेश मुंदडा यांच्या कार्यकाळात राबविले गेले विविध उपक्रम

0

अमळनेर (प्रतिनिधि)
अमळनेर लायन्स क्लब ने २०२२-२३ या वर्षभरात सामाजिक,शैक्षणिक तसेच आरोग्यविषयक केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल क्लब ला विविध पुरस्कारांनी मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.यावेळी माजी अध्यक्ष तथा विद्यमान झोन चेअरमन योगेश मुंदडा यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
मुंबई येथील सहारा स्टार हॉटेल येथे लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३४H२ यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात माजी प्रांतपाल एमजेएफ पुरुषोत्तम जयपुरीया,माजी आंतरराष्ट्रीय संचालक डॉ.नवलजी मारू,ग्याट एरिया लीडर विनोद वर्मा,प्रसिद्ध गजलकार अशोकजी कोसला यांच्या हस्ते अमळनेर लायन्स क्लब ला एकूण ६ पुरस्कारांनी गौरविण्यात आले.यात २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या भव्य एक्स्पो साठी डिस्ट्रिक्ट इमेज बिल्डिंग अवॉर्ड,आजादी का अमृत महोत्सव उपक्रमातअंतर्गत शहरातून १ कि.मी. लांब काढण्यात आलेल्या तिरंगा रॅली साठी माय नेशन माय प्राईड अवॉर्ड,अमळनेर येथील सखाराम महाराज यात्रोत्सवात आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मधुमेह रुग्णांसाठी उपक्रम राबविल्याबद्दल मधुमेह जनजागृती अवॉर्ड,२०२२-२३ वर्षभरात लिओ क्लब चा सक्रिय सहभाग नोंदवून घेतल्याबद्दल बेस्ट मुमेन्ट विथ लिओ क्लब अवॉर्ड,अमळनेर लिओ क्लब ला बेस्ट लिओ क्लब अवॉर्ड,तर सी.ए.नीरज अग्रवाल यांना बेस्ट झोन चेअरमन अवॉर्ड या पुरस्कारांनी अमळनेर लायन्स चे माजी अध्यक्ष व विद्यमान झोन चेअरमन एमजेएफ ला.योगेश मुंदडा,एमजेएफ ला.विनोद अग्रवाल,सी.ए.ला.नीरज अग्रवाल,ला.जितेंद्र जैन,तसेच लिओ चे माजी अध्यक्ष हरिओम अग्रवाल, निधीश कोचर,लिओ अध्यक्ष प्रणित झाबक,कुशल गोलेच्छा,हर्ष भंडारी यांना मुंबई येथे सन्मानित करण्यात आले.
याआधी देखील नागपूर येथे झालेल्या मल्टिपल डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स मध्ये बेस्ट लिओ मुमेंट साठी प्लॅटिनम अवॉर्ड तर जळगाव येथिल लायन्स क्लब इंटरनॅशनल विभागीय परिषद आयोजित जल्लोष २०२३ या कार्यक्रमात ९ विविध प्रकारच्या पारितोषिकांनीअमळनेर लायन्स क्लब ला गौरविण्यात आले आहे.विविध
पुरस्कार मिळाल्याबद्दल अमळनेर लायन्स क्लब चे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.वर्षभरात सर्वच लायन्स तसेच लिओ पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळेच पुरस्कार मिळाल्याचे माजी अध्यक्ष योगेश मुंदडा यांनी सांगितले

अमळनेर लायन्स क्लब ने २०२२-२३ या वर्षभरात अध्यक्ष योगेश मुंदडे यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रम राबविले.यात अंबर्शी टेकडीवर वृक्षारोपण,समाजातील विशेष काम करणाऱ्या महिलांचा सन्मान,लहान व्यावसायिकांना छत्र्यांचे वाटप,स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रध्वजाचे वाटप,गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया,किडनी संबंधित मूत्रपिंड व मूत्रविकार आजाराच्या रक्त तपासण्या व उपचार,जनावरांसाठी लंपी आजारावरील लसीकरण शिबिराचे आयोजन,महारक्तदान शिबिरात सक्रिय सहभाग,गांधी जयंती निमित्त सायकल रॅली व सेवा सप्ताहाचे आयोजन,सांस्कृतिक व सामाजिक   लायन्स एक्स्पो चे आयोजन,मरणोत्तर नेत्रदान चळवळ राबविणे,महिला दिनानिमित्त  आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन,बाजारपेठेत पाणपोईची उभारणी यासह विविध उपक्रम वर्षभरात राबविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!