तालुक्यात रढावन येथे एकाचा विहिरीत बुडून तर दुसऱ्याचा देवळी शिवारात खदानीत बुडून मृत्यू झाला आहे.

अमळनेर (प्रतिनिधि) तालुक्यात रढावन येथे एकाचा विहिरीत बुडून तर दुसऱ्याचा खदानीत बुडून मृत्यू झाला आहे.
नितीन अंबादास मराठे वय ४२ रा मुसळी ता धरणगाव हल्ली मुक्काम रढावण राजोरे हा आपला भाऊ शरद मराठे ,आई सोबत १९ जुलै रोजी शेतात काम करत होता.दुपारी अडीच वाजेला भाऊ घरी जायला निघाला असता नितीन ने मी नन्तर येतो असे सांगितले. मात्र तो घरी पोहचला नव्हता. २१ रोजी सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास त्याचेच मामा राजेंद्र चिंतामण काळे यांच्या शेतातील विहिरीत नितीनचे प्रेत तरंगताना आढळून आले. अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल हितेश चिंचोरे करीत आहेत.
दुसरी घटना चोपडा रोड वर खदानीत घडली आहे. ताडेपुरा येथील देवा धाकू पारधी वय ४० हा मजुरी करत होता. दोन दिवसांपासून तो कामाला गेला होता परंतु घरी परतला नव्हता. २१ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास देवळी शिवारातील खदानीत देवा मयत अवस्थेत आढळून आला. देवाच्या आतेभावाने खबर दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करीत आहेत.