जिल्हाधिकारी अमन मित्तल व जि.प. सीईओ डॉ. पंकज आशिया यांची दोघांची अचानक बदली !

24 प्राईम न्यूज 22 Jul 2023 राज्य शासनाने आज काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील अमन मित्तल आणि डॉ. पंकज आशिया यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नसतानाच त्यांची बदली करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांना जळगाव जिल्ह्यात येऊन एक वर्ष झाले होते.त्यांच्या अचानक झालेल्या बदली मुळे त्रकवितरक काढले जात आहे पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी असलेले आयुष प्रसाद यांची जळगाव जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची देखील बदली झाली आहे. त्यांना आता यवतमाळ येथील जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी मिळाली आहे. याबाबतचे आदेश अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी काढले आहेत.