शेर ए हिंद टिपू सुलतान बहुउद्देशीय संस्थेच्या अभिनव उपक्रम..
-तांबापुर मध्ये सामूहिक रित्या समान नागरी कायद्याला विरोध..
-हजारो लोकांनी स्वेच्छेने पत्रावर केल्या स्वाक्षऱ्या..

जळगाव ( प्रतिनिधि )
भारतीय विधी आयोगाने समान नागरी कायदा लागू करावा किंवा नाही यासाठी लोकांचे सूचना मागवल्या असून त्याची अंतिम मुदत २८ जुलै आहे रविवार २३ जुलै रोजी तांबापुर येथील शहीद शेरे हिंद टिपू सुलतान बहुउद्देशीय संस्थे द्वारा तांबापुर मधील नागरिकांसाठी समान नागरी कायद्याला विरोध का व कशासाठी त्याबाबत एक सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते व त्या
द्वारे त्या ठिकाणी समान नागरी कायद्याला विरोध का करावा याबाबत मान्यवरांनी आपले विचार मांडले व त्यानंतर हजारो लोकांनी व खास करून महिलांनी पत्रावर आपल्या स्वाक्षऱ्या केल्या.
या पत्रात नमूद आहेकी मी समान नागरी कायद्याचा स्वीकार करतो व भारतीय घटनेने दिलेल्या धार्मिक स्वंतत्र सह मी भारताचा नागरिक म्हणून राहील.

यांचे मिळाले सहकार्य
अर्षद शेख ऊर्फ सोनू, पत्रकार शाहीर तेली, जिल्हा मणियार बिरादरी चे अध्यक्ष फारुख शेख, टिपू सुलतान संस्थेचे अध्यक्ष खलीलोद्दिन शेख, उपाध्यक्ष खलील शेख, मुस्ताक पिंजारी, राजाभाई शेख, शाहरुख बाबा, तबरेज बागवान, तर पत्र लिहिण्यास शादाब शेख, कामिल शेख, आसिफ पिंजारी, मुजाहिद शेख व आसिफ शेख यांनी परिश्रम घेतले.
सदर पत्र लिहिण्याचे कार्य सोमवार व मंगळवार रोजी सुरू राहणार असून तांबापुर येथील लोकांनी अर्शद शेख, मुस्ताक पिंजारी व पत्रकार शाहीर तेली यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी केले आहे.