पद्माई पार्क रस्त्याची दुरावस्था, -अजून किती दिवस सहन करावा लागेल, नागरिकांचा प्रश्न…

एरंडोल ( प्रतिनिधि)पद्माई पार्क रस्त्याची दुरावस्था जल जीवन मिशनचे अंतर्गत नवीन पाईपलाईनचे काम करताना नवीन वसाहती मधील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. धड चालायला सुद्धा जागा नाही.सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे, परंतु नगरपालिका व नगरसेवक याकडे दुर्लक्ष करीत आहेत.नवीन वसाहती मधील लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. गटारीचे काम हे चांगल्या हेतूने जरी असले तरी व्यवस्थित मॅनेजमेंट नाही.सर्व रस्ते त्यांनी एकदमच बंद करून टाकलेले आहेत. घरातून रोडवर निघायला रस्ताच नाही. त्यांनी कोणतीच पर्यायी व्यवस्था देखील केलेली नाही. व गटारीचे काम किती दिवस चालेल हे देखील सांगू शकत नाही त्यामुळे हा त्रास नवीन वसाहती मधील लोकांना अजून किती दिवस सहन करावा लागेल याबाबत प्रश्नचिन्हच आहे. तसेच अतिशय रहदारीचा जुना धरणगाव रोड जिथे हायवेला मिळतो त्या सर्कलचे काम अजून बाकीच आहे.येथे वाहनांची खूपच वर्दळ असून देखील शासन(ठेकेदार) याकडे दुर्लक्ष करीत आहे. येथे हायवे क्रॉसिंग ला खूप त्रास होतो.