शालेय क्रीडा स्पर्धचा पोळा फुटला
सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेला शानदार सुरुवात..

जळगाव ( प्रतिनिधी)
आंतर शालेय क्रीडा स्पर्धांना २४ जुलैपासून सुरुवात झाली असून सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धांना शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरुवात करण्यात आली.
१४वर्षातील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा
जिल्हास्तरीय म्हणजेच उर्वरित आंतरशालेय १४ वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात झाली असून या स्पर्धा नाक आउट पद्धतीने खेळवल्या जात आहे.
उद्घाटन समारंभ
या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे समन्वयक अरविंद देशपांडे, जिल्हा फुटबॉल
संघटनेचे सचिव फारूक शेख यांच्या उपस्थितीत पार पडला. क्रीडा अधिकारी श्रीमती सुजाता गुल्हाने व एन आय एस फुटबॉल प्रशिक्षक अब्दुल मोहसीन यांची विशेष उपस्थिती होती.
१४ वर्षातील स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

१)अंजुमन जामनेर वि. वि थेपडे स्कूल असोदा ३-०
२. सेंट एलआयसीस स्कूल वि. वि भुसावळ बगो शानबाग ४-०
३. काशिनाथ पलोड वि. वि बियाणी पब्लिक स्कूल भुसावळ २-० (पेनल्टी)
४. इकरा मोहाडी वि. वि रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल जळगाव १-०
५. पोद्दार यावल वि. वि सेंट जोसेफ चाळीसगाव ३-०
६. ताप्ती पब्लिक स्कूल भुसावल वि. वि डॉ. उल्हास पाटील सावदा ८-०
७. अंजुमन जामनेर वि. वि डॉक्टर उल्हास पाटील भुसावल १-०
८. सेंट अलायसीस वि. वि भुसावल लॉर्ड गणेशा जामनेर ३-१
९. काशिनाथ पलोड वि. वि पोद्दार यावल १-०
१०.ताप्ती पब्लिक स्कूल भुसावल वि. वि इकरा मोहाडी ४-०
२५ जुलै बुधवारी होणारे उपांत्य फेरी चे सामने
१.अंजुमन जामनेर विरुद्ध काशिनाथ पलोड
२. सेंट ऑलायसिस भुसावल विरुद्ध ताप्ती पब्लिक,भुसावळ
स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रयत्नशील पंच
पंच म्हणून कौशल पवार, आकाश कांबळे, धनंजय धनगर, सुरज सपके, संजय कासदेकर, दिनेश सिंग, अरशद शेख, नीरज पाटील, वसीम शेख, सिद्धार्थ अडकमोल, लोकेश मांजरेकर.
स्पर्धेचे वेळा पत्रक
बुधवारी १७ वर्षातील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा होतील व १४ वर्षातील फुटबॉल स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ पार पाडणार आहे.
- गुरुवार 26 जुलै रोजी १७ वर्षातील मुलींच्या फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होईल.
मनपा स्तरीय फुटबॉल

स्पर्धा २७ जुलैपासून
जळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील १४ व १७ वर्षे आतील मुले व मुलींच्या फुटबॉल स्पर्धा २७ ते २९ जुलै दरम्यान क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे तरी क्रीडा शिक्षकांनी याची नोंद घ्यावी असे आव्हान जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, मनपा क्रीडा अधिकारी बाळू भामरे व संघटनेचे सचिव फारूक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.