स्वर्ण पैलेस सराफ दुकानातून सोने चांदी चोरणारा आझाद नगर पोलीसांच्या जाळ्यात.

0

धुळे (अनिस खाटीक) १०/०७/२०२३ रोजीचे पहाटे ०४.०० वा. चं दरम्यान आझादनगर पोलीस स्टेशन हद्दीतील आग्रारोडवरील स्वर्ण पैलेस हे सराफ दुकान ०३ अज्ञात इसमांनी घरफोडी चोरी करून सोन्या चांदिचे दागिने चोरून नेले होते. त्यावरून फिर्यादी

नाम प्रकाश जोरावरमल चौधरी, रा. नित्यानंद नगर, नटराज टॉकीज जवळ, धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक २०/०७/२०२३ रोजी आझादनगर पो. स्टे. येथे गुरनं. १८८/२०२३ भादवि कलम ४५७, ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा घडल्यानंतर आझादनगर पो. स्टे. कडील अधिकारी व कर्मचारी यांनी सराफ दुकानातील प्राप्त सी. सी. टि. व्हि. फुटेज तसेच बाजारपेठेतील दुकानातून सी. सी. टि. व्हि. फुटेज प्राप्त करून घेवून त्याचे विश्लेषन केले. गुन्हयाचे तपासात असताना मा. पोलीस निरीक्षक श्री. नितीन देशमुख यांना नमुद गुन्हा हा किशोर टाक, रा. जालना याने त्यांचे इतर साथीदारांसह केला असल्याबाबत गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने माहिती मिळाल्याने आझादनगर पो. स्टे. कडील तपासपचकातील अधिकारी व कर्मचारी यांना रवाना करून आरोपीतास ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले. त्यानुसार पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी जालना या ठिकाणी जावून आरोपीत नामे किशोरसिंग रामसिंग टाक, वय २५ वर्ष, रा. गुरूगोविंद नगर, शिवाजीनगर जवळ, जालना, जि. जालना यास ताब्यात घेवून त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने नमुद गुन्हा हा त्याचे इतर दोन साथीदार यांचे मदतीने केला असल्याचे सांगितल्याने पथकाने किशोरसिंग टाक याचा दुसरा साथीदार नाम झेनसिंग ऊर्फ लकी जिवनसिंग जुन्नी, वय २८ वर्ष, रा. नवनाथ मंदिराजवळ, हरिविठ्ठल नगर, जळगांव या ठिकाणावरून ताब्यात घेतले.

वर नमुद दोन्ही आरोपीत यांचेकडून ६०,०००/- रु. रकमेची ०१ किलो २० ग्रॅम चांदिच्या पट्टी स्वरूपात ५ लगड, ७२,०००/- रू. रकमेची १४.४३० ग्रॅम वजनाचे सोन्याच्या ३ लगड, ४०,०००/- रु. रकमेची काळया रंगाची हिरो पेंशन मोटार सायकल असा एकूण १,७२,०००/- रू. रकमेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपीत नामे किशोरसिंग रामसिंग टाक हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर वेगवेगळ्या जिल्हयांमध्ये एकुण ३१ घरफोडी जबरी चोरी सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

वर नमुद कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय बारकुंड सो, धुळे मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे सो. धुळे, मा. सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी धुळे शहर विभाग, धुळे श्री. ऋषीकेश रेड्डी सो. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. नितीन देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक श्री. संदिप पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री. मिलींद नवगिरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश माळी, पोहेका योगेश शिरसाठ, पोलीस नाईक योगेश शिंदे, संदिप कढरे, अविनाश लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल अझहर शेख, सचिन जगताप, निलेश पाकड़, पंकज जोंधळे, सिध्दार्थ मोरे महिला पोलीस शिपाई पवार व पारेराव अशांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!