शिवाजीराव पाटील लिखित, “निर्भंगावली”प्रबोधन नव्या युगाचे या द्विखंडात्मक ग्रंथाचा प्रकाशन सोहळा प्रतिइतिहासकार चंद्रशेखर शिखरे यांच्या हस्ते ३० जुलै रोजी…

0

अमळनेर (प्रतिनिधि )येथील सुप्रसिद्ध लेखक व सामाजिक चळवळीतील विचारवंत प्रा शिवाजीराव पाटील लिखित “निर्भंगावली”प्रबोधन नव्या युगाचे या द्विखंडात्मक ग्रंथाचा प्रकाशन सोहळा प्रतिइतिहासकार चंद्रशेखर शिखरे यांच्या हस्ते रविवार ३० जुलै रोजी रोटरी हॉल येथे ४ वाजता संपन्न होणार आहे.
सदर प्रकाशन समारंभास प्रमुख वक्ते लेखक,विचारवंत,संपादक गंगाधर बनबरे , सत्यशोधक वारकरी महासंघाचे अध्यक्ष शास्त्रीय भगवानदास घुगे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निवृत्त मुख्याध्यापिका व निर्भंगावलीकार प्रा शिवाजीराव पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुमनताई पाटील उपस्थित असतील. याप्रसंगी माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, खा.शि. मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल शिंदे, पाडळसे धरण जन आंदोलन समितीचे प्रवर्तक सुभाष चौधरी, प.स. चे मा.सभापती संदीप पाटील ,मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा अशोक पवार यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर व सामाजिक चळवळीतील प्रमुख पदाधिकारी या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत सदर सोहळ्यास वाचक श्रोते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्यावतीने मराठा सेवा संघ राष्ट्रीय किसान मोर्चा युवा कल्याण प्रतिष्ठान, सर्व पुरोगामी संघटनांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!