पालकमंत्र्यांकडून भावी कुस्तीपटूंना पाच लाखाची मॅट व साहित्य भेट,
श्री व्यायाम प्रसारक मंडळ धरणगाव तर्फे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचा सत्कार.

धरणगाव (प्रतिनिधि ) येथील श्री व्यायाम प्रसारक मंडळ संचलित व्यायाम शाळेत शेकडो तरुण हे कुस्तीचा सराव करत आहे. या तरुणांनी एक चांगले कुस्तीपटू होऊन देशाचे नाव उज्वल करावे याकरिता या तरुणांना प्रशिक्षण दिले जात आहे. या तरुणांना सराव करताना अडचणी यायला नको याकरिता पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी पाच लाख रुपये किमतीची मॅट तसेच इतर कुस्तीचे साहित्य भेट स्वरूपात दिले. या साहित्यामुळे तरुणांना कुस्तीचा सराव करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. व्यायाम शाळेला हे साहित्य दिल्याबद्दल मंडळातर्फे श्री गुलाबरावजी पाटील यांचा रविवारी सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष भानुदास विसावे, खजिनदार कमलेश तिवारी, देविदास महाजन, गुरु पहेलवान, जीवन आप्पा बैस, नारायण महाजन, शरद भोई, गोविंद पूरभे, जितेंद्र पूरभे, विजय शुक्ल, बापू माळी, नितीन महाजन यांसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी तरुणांना वेळोवेळी जी मदत लागेल ती पुरविण्याचे आश्वासन देखील दिले. या मदतीमुळे कुस्तीपटू तरुणांनी पालकंत्र्यांचे आभार मानले.