ट्रीपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी बनले विश्व विजेता…

24 प्राईम न्यूज 30 Jul 2023 ट्रिपल महाराष्ट्र केसरी तथा सध्या – पुण्यात सहायक

पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असणारे चाळीसगाव तालुक्याचे सुपुत्र महाबली विजय चौधरी यांनी कॅनडात सुरू असलेल्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेममध्ये सुर्वणपदक पटकावून देशासह आपल्या जिल्ह्याचा,तालुक्याचा देखील नावलौकीक उंचावला आहे. कॅनडातील विनीपीग शहरात २८ जुलैपासून जागतिक पोलीस आणि फायर स्पर्धा सुरू झालेली आहे.