‘तुम्हाला जगायचे आहे का’ पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा ई-मेल.

24 प्राईम न्यूज 31 Jul 2023
सभाजी भिडे यांनी महात्मा गांधीच्या सदर्भात केलेल्या अपमानजनक विधानानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत आक्रमक होत संभाजी भिडेंना | अटक करण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने गुरुजींना अटक करण्याची भाषा करता, तुम्हाला जगायचे आहे का?” अशा धमकीचा ई-मेल पृथ्वीराज चव्हाण याना आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणाच्या सुरक्षेत वाढ | करण्यात आली असून, त्याच्या कराड येथील निवासस्थानी पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. पोलिसानी ई-मेलद्वारे धमकीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. धमकी देणारी व्यक्ती नांदेडची असून, त्याला अटक करण्यात आली आहे.