मनोहर भिडे विरुद्ध भूमिका स्पष्ट करावी – अशोक चव्हाण

24 प्राईम न्यूज 31Jul 2023
महात्मा गांधीसह अनेक महापुरुषाविरुद् अपमानजनक वक्तव्य करणारे मनोहर भिडे अजूनही खुलेआम फिरताहेत, त्यांना साधी अटक सुद्धा झालेली नाही. दुसरीकडे भिडेंविरुद्ध कारवाईची मागणी करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जिवे मारण्याची धमकी दिली जाते. एकीकडे भाजप म्हणते, आमचा मनोहर भिडेंशी संबंध नाही. दुसरीकडे त्यांचेच नेते व कार्यकर्ते भिडे समर्थकांच्या खांद्याला खांदा लावून कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी करतात. हा सारा प्रकार निषेधार्ह आहे. बुधवारी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राज्य सरकारने प्रत्यक्ष व ठोस कृतीतून आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यानी केली आहे.