महाविकास आघाडीतर्फे संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत, -कठोर कारवाईची केली मागणी.

अमळनेर (प्रतिनिधि)
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्या प्रकरणी संभाजी भिडे यांचा अमळनेर महाविकास आघाडी तर्फे जाहीर निषेध करण्यात आला.त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना निवेदन देण्यात आले.
अमरावती येथील कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते.या वक्तव्याने जनमानसाच्या भावना दुखावल्या गेल्या असून अमळनेर तालुका महाविकास आघाडी तसेच समविचारी पुरोगामी संघटनाकडून भिडेंच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) गटाच्या जेष्ठ नेत्या तिलोत्तमा पाटील,शहराध्यक्ष शाम पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.अनिल शिंदे,प्रा.सुभाष पाटील,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष(ठाकरे गट)श्रीकांत पाटील,विजय पाटील,अनंता निकम,काँग्रेस चे मुन्ना शर्मा,बी.के.सूर्यवंशी,संदीप घोरपडे,के.डी.पाटील,अँड.रज्जाक शेख,राजू चंडाले, तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.