कायदा शाबूत आहे, याची हमी महिलांना द्यावयाची असेल तर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, -अमळनेरातील महिला संघटनांनी केली मागणी..

अमळनेर (प्रतिनिधी ) महिला आणि बालिकांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना शिक्षा करण्याच्या मागणीसाठी अमळनेरातील विविध महिला संघटनांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रांताधिकाऱ्यांमार्फत निवेवदन पाठवण्यात आले.
प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील लोंढे तालुक्यातील खडके येथील बालगृहात मुलींच्या आरक्षणासाठी नेमलेल्या काळजीवाहक गणेश शिवाजी पंडित यानेच पाच मुलींवर अत्याचार केले ज्याला फुले सांभाळण्याची जबाबदारी दिली त्यांनी फुले कुचकरण्याचे नीच कृत्य केले. ही घटना अतिशय निंदनीय आहे त्याचप्रमाणे नुकतीच मणीपूर येथील घटना संपूर्ण समाजाला प्रशासनाला सरकारला मान खाली घालायला लाजिरवाणी आहे उघड्यावर रस्त्यावर महिलांवर अत्याचार केले जातात. पण अत्याचार करणाऱ्या नराधमांना रोखण्याचे धाडस कोणाला आले नाही, म्हणून या देशाची लोकशाही न्यायव्यवस्था आणि कायदा शाबूत आहे, याची हमी महिलांना द्यावयाची असेल तर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, जलद न्यायालयात दोन्ही खटले चालवावेत आणि कुठल्याही प्रकारची माफी अथवा सहानुभूती न दाखवता घटनांच्या जखमा ताज्या असतानाच त्यांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी या निवेदनातून महिलांनी केली आहे. निवेदन देताना अमळनेर महिला मंच ट्रस्ट, आधार संस्था, अमळनेर मराठा महिला मंडळ, ग्राहक मंच, अमळनेर महिला वकील संघ, योग ग्रुप, अग्रवाल महिला मंडळ, गुजराती महिला मंडळ आदी संघटनाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. निवेदनावर तिलोत्तमा पाटील,प्रा. शिला पाटील, अॅड. भारती राजेश अग्रवाल, डॉ. अपर्णा मुठे, विद्या हजारे,आरती पोळ, माधुरी पाटील, कल्पना पाटील, सुलोचना वाघ, दीपा सोनावणे, रेणू प्रसाद, डॉ. भारती पाटील, अश्विनी भदाणे, ज्ञानेश्वरी पाटील, नंदिनी मैराळे, सुषमा वाघ, यास्मिन शेख, दीप्ती गायकवाड, सीमा सूर्यवंशी, कांचन शहा, राजश्री कल्याण पाटील, रीता बाविस्कर, मनीषा पाटील, रागिनी महाले, पद्मजा पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
मनीपूर घटनेसंदर्भात शांतता प्रस्तापित करावी
मनिपूर येथील सर्व दोषींवर त्वरित कठोर कारवाई करून शांती प्रस्थापित करण्यात यावी अशी मागणीही महिलांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान मोदी यांना निवेदन सादर केले आहे. त्या म्हटले आहे की मणिपूरच्या कुकी आदिवासी महिलांवर जो अन्याय झाला आहे त्या घटनेला ६० दिवसांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. परंतु या प्रकरणातील फक्त सात वगळता इतर सर्व आरोपी मोकाट फिरत आहेत. मणिपूर मधील महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि न्याय मिळवण्यासाठी आपणास आम्ही सर्व महिला मोठ्या आशेने पहात आहोत. आपण लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्याच्या आदेश देऊन आपल्याच देशाच्या माता-भगिनींना न्याय मिळवून द्यावा ही अपेक्षा तसेच मणिपूरमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी देखील लवकरात लवकर योग्य ती पावले उचलण्यात जावी अशी मागणी महिलांनी केली आहे.
………..
महिला कोणत्याही जात, धर्म, पंथच्या लढाईसाठी नाहीत
मनीपूर येथील घटनेतील दोषींच्या आईचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी समाजासाठी त्यांच्या मुलांनी केलेल्या कृत्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे महिला या कोणताही जात, धर्म, पंथ यांच्या लढाईसाठी नाही. हा संदेश या निमित्ताने गेला पाहिजे ही अपेक्षा आहे. आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आहे.
डॉ.भारती पाटील, आधार संस्था अमळनेर