संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल..

24 प्राईम न्यूज 1 Aug 2023
महात्मा गांधी यांच्या संबंधात अवमानकारक विधाने केल्याच्या कारणावरून अमरावती पोलिसांनी हिंदुत्ववादी विचारांचे नेते संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेसने विधानसभेत हा विषय लावून धरला होता व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.. अमरावतीतील राजापेठ पोलिसांनी भिडे यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम १५३ अ (धर्म, वंश, जन्म स्थान, निवासस्थान, भाषा इत्यादी कारणांवरून विविध गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.