प्राण घातक हत्यार जवळ बाळगणाऱ्या दोघांवर चाळीसगाव शहर पोलिसांची कारवाई..

0

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) शहरातील, शास्त्रीनगर भागातील साई बाबा मंदीराजवळ तलवार व चॉपर घेवून फिरणाऱ्या दोघांना चाळीसगाव शहर पोलिसांनी दि 1 रोजी रात्री 1-15 वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले असून दोघांवर चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि 1 रोजी रात्री 1-15 वाजेच्या सुमारास शहरातील शास्त्रीनगर भागातील साई बाबा मंदीराजवळ दोन इसम परीसरात दहशत करण्याचे उद्देशाने फिरत आहेत अशी गोपनीय माहिती पोकॉ गणेश कुवर व अमोल भोसले यांना मिळाल्यावर त्यांनी सदर माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना दिल्यावर वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे हवालदार योगेश बेलदार, पोलीस नाईक दिपक पाटील, पोकाँ निलेश पाटील, अमोल भोसलेे, पोकॉ/1622 नंदकिशोर शिवराम महाजन, शरद पाटील यांनी वरील ठिकाणी जावून दोघांना ताब्यात घेतले त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे मोटारसायकल वर पाठीमागे बसलेल्या एकाकडे स्टिलची तलवार मिळुन आली दुसऱ्याच्या कंबरेला एक चॉपर मिळुन आला त्यांनी त्यांची नावे मंजितसिंग दिलीपसिंग बावरी 19 रा. दिलीपसिंग बावरी, शैंदला, मेहकर बुलढाणा ह.मु बस स्टँण्डच्या पाठीमागे, चाळीसगाव व किरण सखाराम गवळी 22 रा. लक्ष्मीनगर, संतोषीमाता मंदीरामागे, चाळीसगाव असे सांगितले दोघांवर चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह मुंबई पोलीस कायदा कलम 37(1) (3) चे उल्लघन 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास हवालदार योगेश बेलदार व पोकाँ निलेश पाटील करीत आहेत. आरोपी मंजितसिंग दिलीपसिंग बावरी यास सन 2022 मध्ये चोरी प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन कडून अटक करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!