लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या धुळे शहर कार्यालयात या महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी साजरी..

धुळे ( प्रतिनिधि) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या धुळे शहर कार्यालयात या महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी आज दिनांक १ ऑगस्ट २०२३ रोजी साजरी करण्यात आली व पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला……..
मातंग समाजाचे नेते थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी आज जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार श्री अनिल अण्णा गोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,श्री राजेंद्र वाकळे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या असंतोषाचे जनक व क्रांतिकारी नेते कै.लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिना निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य आबासाहेब एन. सी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे आयोजन तथा नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनियुक्त महिला जिल्हा ग्रामीण अध्यक्षा सौ उषाताई पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आले. तथा धुळे ग्रामीण भागातील महिला,पुरुष,युवती,तरुणांचा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार श्री अनिल अण्णा गोटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला प्रदेश उपाध्यक्षा सौ शोभाताई आखाडे,महिला प्रदेश सरचिटणीस सौ छायाताई सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.
यावेळी मंगलाबाई पाटील सर्व राहणार (तीखी) गाव, मनीषा पाटील,सरला बाई गवळी, केवल धर्मराज पाटील, मंगलाबाई गवळी,शोभाताई गवळी, वर्षा पाटील, ज्ञानेश्वर पाटील, शिवाजी मोरे, आनंदा पाटील,राजेंद्र पाटील, दत्तात्रय पाटील, अर्जुन गवळी, संगीता जोशी, कांताबाई गवळी, दिशा पाटील आदी सर्व राहणार (तीखी) असे उपस्थित मान्यवरांनी पक्ष प्रवेश केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रामीण कार्याध्यक्ष श्री प्रशांत भाऊ भदाणे,वी.क्षेत्र आध्यक्ष श्री विजय भाऊ वाघ,अल्पसंख्यांक विभागाचे ग्रामीण अध्यक्ष सलीम भाई शेख, डॉ सेल प्रदेशचे सेक्रेटरी डॉ अनिल पाटील सर,कार्यालय प्रमुख अकबर अली सय्यद सर, यशवंत पप्पू पाटील, युवकचे योगेश भाऊ गोसावी,सौ गायत्री ताई पाटील, सौ ज्योती ताई चौधरी,सौ सुरेखा ताई नांद्रे, अहिरराव सर, विशाल चित्ते, प्रशांत वाकळे आदी मान्यवर पदाधिकारी व महनीय कार्यकर्ते उपस्थित होते. अशी माहिती कार्यालय प्रमुख अकबर अली सय्यद सर यांनी दिली व अविनाश भाऊ लोकरे प्रसिद्ध प्रमुख व सोशल मीडिया प्रमुख धुळे शहर कार्यकारणी यांनी प्रसिद्ध केली.