मनोहर भिडे याच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा त्याला येरवडा येथील मनोरुग्णांच्या तुरुंगात डांबून टाकावे.. -समता परिषद व माळी समाजातर्फे मागणी..

0

अमळनेर( प्रतिनिधि )
वाचाळवीर मनोहर भिडे याचे मानसिक संतुलन बिघडल्याप्रमाणे वागत असून महापुरुषांबाबत अपमान कारक वक्तव्य करीत आहे. मनोहर भिडे याच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा येरवडा येथील मनोरुग्णांच्या तुरुंगात त्यास डांबून टाकावे

प्रतिकात्मक पुतळा दहन करून केला निषेध

अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, महाराष्ट्र माळी समाज महासंघ व माळी समाज पंचमंडळ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांनी केली असून यासंदर्भात तहसीलदार अमळनेर यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समता परिषद व माळी समाजाच्या वतीने निवेदन सादर केले आहे. मनोहर भिडे याच्यावर लवकरात लवकर कारवाई केली नाही तर राज्यभर समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील यावेळी समता परिषदेतर्फे व माळी समाजातर्फे यांनी दिला आहे.
मनोहर भिडे याने मागील काही दिवसापूर्वी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबत अवामानकारक वक्तव्य केले होते. मनोहर भिडे याच्याकडून नेहमीच महापुरुषांबाबत अपमान कारक वक्तव्य करण्यात येऊन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे समाजात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. मनोहर भिडे याच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अन्यथा त्याला येरवडा येथील मनोरुग्णांच्या तुरुंगात डांबून टाकावे अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, क्षत्रिय काच माळी समाज पंचमंडळ, महाराष्ट्र माळी समाज महासंघ, क्षत्रिय फुल माळी समाज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तहसीलदार अमळनेर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदरील निवेदन देताना समता परिषदेच जळगाव जिल्हा उपाध्यक्ष भीमराव महाजन, शहरअध्यक्ष प्रताप पाटील माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन सर, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे तालुकाध्यक्ष महेंद्र महाजन,माजी नगरसेवक देविदास महाजन , गंगाराम निंबा महाजन , दिनेश माळी,मा उपनगराध्यक्ष पांडुरंग नामदेव महाजन, गणेश पांडुरंग महाजन, गुलाब ओंकार महाजन, अँड. सुदाम श्रावण महाजन, अँड. कुंदन साळुंखे, प्रा. अशोक पवार सर, माजी उपनगराध्यक्ष आबू महाजन, सेवा मंडळाचे अध्यक्ष गणेश शंकर महाजन, अँड रमाकांत माळी, अशोक महादू महाजन, बी आर महाजन सर, रमेश सुदाम महाजन, अशोक पोपट महाजन, संजय हिम्मत महाजन, संदीप महाजन सर, ईश्वर चौधरी,साखरलाल महाजन सर, संदिप महाजन सर,योगेश महाजन सर, प्रा. प्रकाश महाजन, सुनील महाजन, योगेश महाजन, श्याम पाटील, विठ्ठल पाटील, जाकीर मेवाती, अनिल महाजन सर ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या रंजना महाजन, चित्रकला महाजन, ज्योती महाजन, प्रतिभा महाजन, रत्ना महाजन, प्रमिलाताई महाजन ,लताबाई महाजन, मनीषा महाजन, अर्चना महाजन, स्मिता महाजन, यांच्यासह समता परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, फुले प्रेमी नागरिक आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!