सुरक्षा रक्षकांच्या गाडीनेच आमदारांच्या गाडीला मागाहून दिली धडक..

अमळनेर(प्रतिनिधि)अमळनेर पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्या वाहनाला पोलिसांच्या हॉडा ३ एस्कॉर्ट पथकाच्या गाडीने धडक दिल्याची घटना ६ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अमळनेर चोपडा रस्त्यावर घडली. आमदार पाटील हे काही कामानिमित्त
चोपड्याला गेले होते. अमळनेरमार्गे पारोळा येथे परत जात असताना सिंधी कॉलनीजवळ असलेल्या स्पीड ब्रेकरजवळ त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांच्या होंडा-३ एस्कॉर्ट गाडीने मागाहून धडक दिली. त्यांनी सीट बेल्ट लावलेला असल्याने त्यांना काहीच इजा झाली नाही.