भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील बालिकेवर झालेल्या अत्याचार व हत्या प्रकरणी सदर आरोपीस पोक्सा अंतर्गत गुन्हा दाखल करा. सकल मराठा समाज व पुरोगामी संघटना तरफे निवेदन.

अमळनेर( प्रतिनिधि) गोंडगाव तालुका भडगाव येथील चिमुकलीवर अपहरण अत्याचार व निर्घृण खून झाला आहे. त्याचप्रमाणे मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सदर आरोपीस पोक्सा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी सकल मराठा समाज व पुरोगामी संघटना यांच्या वतीने विविध तालुक्यांमध्ये शासनापर्यंत हा संदेश जाण्यासाठी निवेदने देण्यात येत आहेत. त्यासाठी अमळनेर येथील सकल मराठा समाज व पुरोगामी संघटना यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना शांततेच्या मार्गाने आज निवेदन देण्याचे ठरले आहे. दि.6 रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने अमळनेर येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि सदर सभेमध्ये हे निवेदन शांततेच्या मार्गाने मा.मुख्यमंत्री मा.गृहमंत्री तसेच मा.महिला आयोग यांना देण्याचे ठरले आहे. तरी सर्व सकल मराठा समाज आणि पुरोगामी संघटना यांनी दि. 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11.00 वाजता प्रांताधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.