अमळनेरचा शिरपेचात नवीन मानाचा तुरा..!

0

अमळनेर (प्रतिनिधि)नगाव येथील रहिवासी दिलीप अजबराव पाटील यांची पुणे मेट्रो क्रेडाई मध्ये सेफ्टी जूरी मेंबर, या अधिकारी पदावर नियुक्ती. त्यांच्या कर्तुत्वावर त्यांनी असंख्य ठिकाणी नियुक्तया घेतल्या असुन 2001 मध्ये फायर अँड सेफ्टी ऑफिसर म्हणून गुजरात येथील नामांकित जनरल मोटर कंपनी येथे त्यांनी काम पाहिले इथूनच त्यांच्या कार्याची सुरुवात झाली असून त्यांनी गुजरात बेंगलोर आणि इतर ठिकाणीही आपल्या कामाचा दबदबा कायम ठेवला. विदेशातही ते कार्यरत असून तेथे ही त्यांनी फायर अँड सेफ्टी ऑफिसर म्हणून कार्य करत असताना देखील सेफ्टी मॅनेजमेंट आणि सेफ्टी ऑडिटर हे प्रशिक्षण पूर्ण केले आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी काम करणारे दिलीप अजबराव पाटील यांना सर्व वातानुकूलित सेवा असताना देखील यांनी माय देशासाठी आपण काहीतरी करावे म्हणून सर्व सुविधांना लाथ मारत ते भारतात परत आले आणि भारतीय तरुणांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी चळवळ सुरू केली. आतापर्यंत त्यांच्या हाताखाली असंख्य सेफ्टी ऑफिसर तयार झालेत, तर 300 तें 400 सेफ्टी ऑफिसर आजही त्यांच्याकडे कर्तव्यावर आहेत फायर अँड सेफ्टी मध्ये मास्टर असलेले दिलीप अजबराव पाटील. हे पुणे कंस्ट्रक्शन इंजीनियरिंग रिसर्च फाउंडेशन चे चार वर्षा पासून सेफ्टी जूरी मेंबर देखील आहेत. आणि बिल्डर असोसिएशन ऑफ़ इंडिया चे दोन वर्षापासून सेफ्टी जूरी मेंबर आहेत. सद्या पुणे येथे आर जे सेफ्टी सर्विस नावाने त्यांची कंपनी नामांकित आहे. दिलीप अजबराव पाटील आणि त्यांची पत्नी प्रियंका पाटील मॅडम देखील पुणे येथेल 39 नामांकित मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये सेफ्टी कंसल्टेंट म्हणून सेवा देत आहेत. सामान्य कुटुंबातील आणि अमळनेर सारख्या ग्रामीण भागातून येऊन आर जे सेफ्टी सर्विस नावाने त्यांनी संपूर्ण भारतात या कंपनीचे जाळे पसरवले आहे. म्हणूनच की काय अमळनेरचा शिरपेचात नवीन मानाचा तुरा..! दिलीप अजबराव पाटील यांच्या नावाने रोवला
गेला अशी तालुक्यात चर्चा होत आहे.
अशा व्यक्तिमत्त्वाचा देश विदेशात आपल्या कर्तृत्वाचा डंका असून भावी पिढीने आदर्श घ्यावा आशा या कर्तुत्ववान दिलीप अजबराव पाटील यांना जळगाव मिरर’ न्यूज कडून पुढील कार्या साठी शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!