हबीबुर्रहेमान सर यांचे शुभहस्ते ध्वजारोहण.. व स्वतंत्र दिनानिमित्त रंगारंग कार्यक्रम साजरा.

0

धुळे (अनिस खाटीक) दिनांक 15 ऑगस्ट 2023यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रियल सर्कल संचलित इस्लाहुल बनात उर्दु गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स धुळे व जकरिया

आघाडी उर्दु प्राथमिक शाळा धुळे या शाळेत संयुक्त स्वतंत्रदिन निमित्त रंगा रंग कार्यक्रम साजरा करण्यात आला . दोन्ही शाळांची विद्यार्थिनींनी खूब छान कार्यक्रम सादर केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक अतीक अख्तर सर होते . तसेच ध्वजारोहण यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रियल सर्कल चे उपाध्यक्ष हबीबुर्रहेमान सर यांचे शुभहस्ते करण्यात आला.प्राचार्य शमसुल हसन सर यांचे मार्गदर्शना खाली व दोन्ही शाळांचे शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विषेश सहकार्याने सदर कार्यक्रम संपन्न झाला . सूत्र संचालन उपशिक्षक गौस रजा सर यांनी केले .या प्रसंगी दोन्ही शाळांचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!