त्या महाविद्यालयीन तरुणांचा जाहीर निषेध सह कडक कारवाईची मागणी – मनियार बिरादरी

जळगाव ( प्रतिनिधी ) जळगाव शहरात उच्च शिक्षणासाठी साक्री धुळे, येथील इम्रान शब्बीर मनीयार व परभणी येथील इक्बाल शेख या तरुणांनी नाव बदल करून महाविद्यालयीन मुलींची ओळख करून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यासोबत जो अत्याचार केला त्या घटनेचा जळगाव जिल्हा मनियार बिरादरीने निषेध केला असून त्या महाविद्यालयीन तरुणांची चौकशी होऊन त्यांच्या विरोधात लवकरात लवकर ३० दिवसाच्या आत दोषारोपण पत्र दाखल करून कायद्यानुसार कडक कारवाईसाठी प्रशासनाने त्वरित योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असा ईमेल पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक रामानंद नगर पो स्टे ला पाठविण्यात आले.
या सभेच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा तथा महाराष्ट्र मनीयार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख हे होते.
सभेत महानगर अध्यक्ष सैयद चांद, जिल्हा बिरादरीचे संचालक अब्दुल रऊफ रहीम, खजिनदार ताहेर शेख, सय्यद नूर टेलर ,तसवर शेख, सह मुंबईचे रियाजुल हक शेख,जुबेदा वी, सय्यद जाफर, अंधेरीचे सलीम शेख, कल्याणचे हनीफ इब्राहिम शेख, एरंडोल चे सय्यद मुस्ताक आदींची उपस्थिती होती.
फोटो
मणियार बिरादरी च्या सभेत निषेधाचा ठराव पारित करतांना अध्यक्ष फारुक शेख व इतर