बाजार समिती कार्यालय येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमत्त समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण..

अमळनेर(प्रतिनिधि )अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमत्त समितीचे सभापती अशोक आधार पाटील

यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.’
ज्या बाजार समितीत शेतात पिकवलेला माल विकायला यायचो त्याच बाजार समितीचा सभापती होवून ध्वजारोहन करण्याचा बहुमान मिळाल्याचा आनंद याप्रसंगी अशोक पाटील यांनी व्यक्त केला.यावेळी उपसभापती सुरेश पाटील,भोजमल पाटील, डॉ.अशोक पाटील,सौ. पुष्पा पाटील,सौ.सुषमा देसले,नितीन पाटील,भाईदास भिल, ऋषभ पारेख,शरद पाटील, गटसाचिव संघटना अध्यक्ष विजय पाटील, कृ उ बा सचिव उमेश राठोड, पराग देसले,विनायक पाटील, आदींसह मान्यवर मोठ्यासंखेने उपस्थित होते.