१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष भिमराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण..

अमळनेर(प्रतिनिधि ) येथील सरस्वती विद्या मंदिर येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भारत मातेसह विविध महापुरुषांचे वेशभूषा धारण करीत देशभक्ती

पर गीत सादर केलीत.तर प्रभातफेरीही काढण्यात आली.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे उपाध्यक्ष भिमराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी अध्यक्ष अशोक पाटील उपस्थित होते.मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी विद्यार्थ्यांना ‘स्वातंत्र्यासाठी त्याग,बलिदान करणाऱ्या महापुरुष, क्रांतिकारक विर सैनिकांचे स्मरणासह आदर्श नागरिकाचे आचरण करणे आवश्यक आहे.’असे सांगितले.कार्याध्यक्ष समाधान शेलार, विनायक पाटील ,पराग देसले उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर समूह गीत सादर केलीत.
भारत माता की जय घोष करीत सरस्वती विद्या मंदिर येथून प्रभातफेरीला सुरुवात करण्यात आली,शंकर नगर,बळीराजा स्मारक,विश्राम गृह,बस स्टँड, पाचपाऊली देवी मंदिर मार्गे तिरंगा चौक येथे न प मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचप्राण शपथ कार्यक्रमस्थळी समारोप करण्यात आला. यशस्वितेसाठी आनंदा पाटील, सौ संगीता पाटील, सौ.गीतांजली पाटील, ऋषिकेश महाळपूरकर,धर्मा धनगर, यांचेसह सागर भावसार, किरण पाटील आदींनी परिश्रम घेतले.