८० वर्षीय सुप्रसिद्ध डॉक्टरची आत्महत्या… -तापी नदी उडी घेत संपविली जीवनयात्रा…

अमळनेर ( प्रतिनिधि)धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील श्री. व्ही. आर. पाटील (वय 80) हे मुळ अंजनविहीरे ता. धरणगाव येथील रहिवाशी आहेत. पाळधी येथील सुप्रसिद्ध डॉक्टर म्हणून व्ही आर पाटील

यांची ओळख आहे. कस्तुरबा नावाचे त्यांचे हॉस्पीटल आहे. श्रीराम जेष्ठ नागरिक मंडळाची त्यांनी स्थापना केली होती. तसेच संत तुकाराम महाराज पंच मंडळाचेही ते अध्यक्ष होते.. पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते असल्याने त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असून यात त्यांचा दलितमित्र पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. काल 15 ऑगस्ट रोजी ही त्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात येणार होता. दरम्यान, डॉ. पाटील यांच्या निधनाची वार्ता कळताच जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी त्यांच्या पाळधी येथील निवासस्थानाजवळ मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पुलावरुन उडी मारण्यापूर्वी त्यांनी चार पानी चिठ्ठी घरी व घटनास्थळी नॅनो गाडीत ठेवली होती. त्यात आपला कार्यभाग उरकला असून त्यामुळे आपण हा जीवनाचा मोह सोडत असल्याचा मतितार्थ असलेला लेख सर्वांना उद्देशून लिहला आहे. डॉ. व्हि आर हे खऱ्या अर्थाने मृत्युंजय असल्याचे अनेकांनी सांगत त्यांना शेवटचा निरोप दिला त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुना जावई असा परिवार आहे.