शिंदे गट भाजपमध्ये जाणार. एकनाथ खडसे यांचे भाकीत

24 प्राईम न्यूज 16 Aug 2023 भाजपला सोडचिठ्ठी देऊन सुरुवातीस काँग्रेस आणि आता राष्ट्रवादीत गेलेले जळगावचे भारदस्त नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेतून फुटून बाहेर निघालेले शिंदे गट आता भाजपमध्ये जाणार असल्याचे भाकीत मंगळवारी व्यक्त केले. त्यांचा निर्णय जवळपास झाल्यात जमा आहे, अशा शब्दांत खडसेंनी आपले म्हणणे मांडले आहे.
याबाबत अधिक स्पष्टीकरण देताना खडसे म्हणाले की, शिंदे गटाचे आमदार भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय झाल्यात जमा आहे. यापूर्वीही शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरले तर पुढे काय? याबाबत चर्चा झाल्या आहेत. त्यांच्यापुढे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय गट स्थापन करणे आणि दुसरा पर्याय एखाद्या पक्षात सामील होणे हा होय. खडसे पुढे म्हणाले की,म्हणाले, भाजपकडून निवडणूक लढण्याची तयारी करीत असणाऱ्यांची फारच अडचण होणार
भाजपमध्ये गेले तरच या आमदारांची अपात्रतेची कारवार्इ वाचू शकते. आज तरी भाजपमध्ये जाण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही.